महिला व माहिती बाल विकास मंत्री आदिती तटकरे

महाराष्ट्र राज्यातील महिला व आणि त्यांच्यावर अवलंबून असणारे त्यांची मुले यांच्या आरोग्य आणि पोषण या स्थितीत अधिक चांगल्या प्रकारे सुधारणा होईल. मित्रांनो विधानसभा निवडणुकीमध्ये गेम चेंजर ठरलेल्या म्हणजेच लाडकी बहीण योजनेने परत पुन्हा महायुती सरकार आणले. ह्याच योजनेतील आता महिनाभरात पाच लाख महिला अपात्र करण्यात आलेल्या आहेत. याची महिला व माहिती बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्स या सोशल मीडिया वरून दिलेली आहे.

पाच लाख वगळण्यात आलेल्या महिलांमध्ये मुख्यतः संजय गांधी निराधार योजनेमधील लाभार्थी असणारे महिला तसेच 65 वर्ष पूर्ण झालेल्या महिला आणि ज्यांच्या कुटुंबांच्या सदस्यांच्या नावे चार चाकी गाडी आहे अशा महिलांची नावे प्रामुख्याने वगळण्यात आली आहेत.

राज्य सरकारने ज्या महिलांना अपात्र करण्यात आले आहे. अशा महिलांकडून पैशांची वसुली होणार नाही. त्यांच्याकडनं परत पैसे घेतले जाणार नाहीत आणि त्यांना जानेवारी महिन्यापासून पुढील कोणताही हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार नाही.

महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी असे सांगितले की जुलै 2024 ते डिसेंबर 2024 या दरम्यान जेवढी पण लाभाची रक्कम ही महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेली आहे ती परत घेतली जाणार नाही.

विधानसभा निवडणूक चालू असताना राज्य सरकारने सांगितले होते की येणाऱ्या काळामध्ये या योजनेचे पैसे 1500 रुपयांवरून वाढून ते 2100 रुपये करणार आहेत.परंतु याची अंमलबजावणी आतापर्यंत करण्यात आलेले नाही. येणाऱ्या काळामध्ये राज्यात अर्थसंकल्प जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पनामध्ये या वाढीव रकमेची घोषणा होण्याची जास्त शक्यता आहे.