या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलींच्या आईवडिलांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करावी लागते. त्यानंतर दोन्ही मुलींच्या नावावर २५०००-२५००० रुपये दिले जातात. या योजनेत पिवळ्या व केशरी रेशनधारकांना लाभ मिळतो. मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये दिले जातात. मुलगी पहिलीत गेल्यावर ६ हजार रुपये आणि मुलगी सहावीत गेल्यावर सात हजार रुपये तर मुलगी अकरावीत गेल्यावर ८००० रुपये दिले जातात. त्यानंतर मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर तिला ७५००० रुपये दिले जातात. याचाच अर्थ असा की तुमची मुलगी १८ वर्षांची होईपर्यंत मुलीच्या नावावर १ लाख १ हजार रुपये जमा झालेले असतात Mazi Kanya Bhagyashree Yojana.

या योजनेत दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना लाभ मिळतो. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या वेबसाइटवर भेट द्यावी लागेल. त्यानंतर फॉर्म डाउनलोड करावा लागेल. हा फॉर्म तुम्हाला महिला व बालविकास विभाग मंत्रालयाकडे जमा करावा लागेल.