मित्रांनो आता फार्मर आयडी बनवल्यानंतर शेतकऱ्यांना काय काय फायदे होणार आहेत या संदर्भात माहिती घेऊ.

  • सर्व शेतकरी योजनांचा सरकारी योजनांचा थेट लाभ आता शेतकऱ्यांना मिळणार मिळेल.
    सरकारी योजनांचा जो पैसा आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट जमा होईल.
  • कोणतेही अनुदान आल्यानंतर आपल्याला जे प्रत्येक वेळेस कागदपत्र जमा करावी लागायची आता ते करावी लागणार नाहीत.
  • कमी कागदपत्रांची गरज भासेल.
  • आयडी दाखवल्याच्या नंतर खात्यामध्ये पैसे जमा होतील.
  • मित्रांनो या फार्मर आयडी चा सर्वात मोठा उपयोग हा पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये मिळवण्यासाठी होईल.
  • त्यानंतर पीक कर्ज घेण्यासाठी तुम्हाला या गोष्टीचा फायदा होईल.
  • शेतामध्ये वापरण्यात येणारी यंत्रे आणि अनुदान मिळण्यासाठी याचा एक वापर होईल.
  • त्यानंतर खत आणि बियाणे खरेदी करण्यासाठी तुम्हाला याचा वापर होईल.
  • शेवटच म्हणजे इतर सरकार योजनांचा लाभ घेण्यासाठी वापर होईल
  • फार्मर आयडी बनवल्यानंतर या सर्व सरकारी योजना राबवण्यात पारदर्शकता येईल आणि याचा लाभ अधिक राहून अधिक शेतकऱ्यांपर्यंत
  • पोहोचेल आणि सर्व सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांना त्यांचे पैसे असतील शेती अवजारे असतील अशा गोष्टींची वितरण करण्यास मदत होईल.
  • यामध्ये अजून एक म्हणजे बँक व्यवहार सुरळीत होतील आणि सोपे होतील शेतकऱ्यांना जास्त बँकेचे चक्रा माराव्या लागणार नाहीत आणि जे
  • प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांना कागदपत्र मागितले जातात वारंवार ते कमी होईल.

 

फार्मर आयडी कागदपत्रे

मित्रांनो फार्मर आयडी बनवण्यासाठी काही कागदपत्रे लागतात.या कागदपत्रांची खालील प्रमाणे माहिती आहे सर्वात प्रथम आपल्याला आधार कार्ड लागेल. यामध्ये तुम्ही ओरिजनल किंवा झेरॉक्स देऊ शकता. त्यानंतर पॅन कार्ड सुद्धा लागेल जात प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र अलीकडील पासपोर्ट साईज फोटो आणि तुमचा मोबाईल नंबर त्यानंतर जमिनीचा सातबारा किंवा उतारा या दोन्हीपैकी एक तुम्हाला द्यावे लागेल. यामध्ये तुम्हाला बँकेचे पासबुक सुद्धा जोडावे लागेल.

जर तुम्हाला स्वतःहून अर्ज करायचा असेल, तर तुम्ही पीएम किसान च्या अधिकृत वेबसाईटवर जा तिथे गेल्यानंतर नवीन नोंदणी या बटनावर क्लिक करा. त्यानंतर तिथे जेवढी माहिती मागत आहे ते सर्व भरा त्यानंतर कागदपत्र सर्व स्कॅन करा. आणि वेबसाईटवर अपलोड करा त्यानंतर तुम्हाला मोबाईलवर एक ओटीपी पाठवला जाईल, ओटीपी तिथे टाका सबमिट करा आणि अर्जाची प्रिंट काढून घ्या farmer id card.