लाडकी बहीण योजना सुरुच राहाणार आहे, या योजनेसाठी 36 हजार कोटी रुपयांची तरतुद केली आहे. 2100 काय तीन हजार रुपये देऊ पण थोडा वेळ थांबावे लागेल. मी तुम्हाला दाव्यानं सांगतो, 2100 नाही तर तीन हजार रुपये देऊ पण काही दिवस थांबावं लागणार आहे. आमच्या लाडक्या बहि‍णींचा आमच्यावर विश्वास आहे. त्यांनी आम्हाला मोठ्या मताधिक्यानं निवडून दिलं आहे. त्याची परतफेड आम्ही करणार आहोत, 1500 रुपये सुरू ठेवणार आहोत, आणि पुढे जसजशी राज्याची परिस्थिती सुधारेल तसतशे 2100 रुपये देऊ आणि आणखी सुधारली तर 3000 हजार रुपये देऊ, असं परिणय फुके यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता महिलांना वाढीव पैसे कधीपासून मिळणार? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.