या योजनेसाठी अर्ज करण्याची सर्वात सोपी पद्धत :-
बिमा सखी योजनेसाठी तुम्ही घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता किंवा तुमच्या जवळच्या एलआयसी ब्रांच मध्ये जाऊन अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत ते म्हणजे वयाचा दाखला रहिवासी दाखला दहावीचे परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र आणि याच बरोबर तुम्ही अटेस्टेड असल्याची कॉपी अशी कागदपत्रे तुम्हाला द्यावी लागणार आहे. तुम्हाला जर ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर खाली सोप्या पद्धतीने माहिती दिलेली आहे :-
- सर्वात आधी तुम्हाला एलआयसीच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागणार आहे या वेबसाईटवर जाण्यासाठी गुगल वर जाऊन “एलआयसी भीमा सखी योजना” असे सर्च करा सर्च केल्यानंतर पहिलीच तुम्हाला एलआयसी ची वेबसाईट दिसेल त्यावर क्लिक करा.
- अधिकृत वेबसाईटची पेज ओपन झाल्यानंतर तिथे तुम्हाला बिमा सखी अप्लाय ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.
- या लिंक वर क्लिक केल्यानंतर नवीन पेज होऊन तिथे एप्लीकेशन फॉर्म ओपन होईल या फॉर्ममध्ये दिलेली जी गरजेची माहिती आहे ती संपूर्ण भरायची आहे.
- संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर एकदा संपूर्ण माहिती चेक करा आणि नंतर खाली दिलेल्या कॅपच्या भरून तुमचा फॉर्म सबमिट करा.