Accident video viral वर्षभरात जगात हजारो लोक रस्ते अपघातात मारले जातात. कधी स्वत:च्या चुकीने अपघात होतो, तर कधी समोरच्या वाहनाच्या चुकीने अपघात होतो. कधी ड्रायव्हरला डुलकी लागते, तर कधी गाडीवरील नियंत्रण सुटते. तर कधी गाडीचा वेग अधिक असल्याने अपघात घडत असतात. ओव्हरटेकिंग किंवा लेन कटिंगमुळेही बरेच अपघात होतात.
Life doesn’t give everyone a second chance; hope they learn from their mistakes
Location – Ranchi- Patna highway
Shared by Dr. Shankar Mahto #driveresponsibly pic.twitter.com/561LfAF60I— Prateek Singh (@Prateek34381357) February 15, 2025
काही जणांना अतिआत्मविश्वास नडतो; तर काही जणांचा अंदाज चुकतो. असाच एक अपघात ओव्हरटेक करताना झाला आहे. या अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला कळेल की, मोठ्या गाड्यांना डाव्या बाजूनं ओव्हरटेक का करु नये.
Life doesn’t give everyone a second chance; hope they learn from their mistakes
Location – Ranchi- Patna highway
Shared by Dr. Shankar Mahto #driveresponsibly pic.twitter.com/561LfAF60I— Prateek Singh (@Prateek34381357) February 15, 2025
रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे, ज्याला पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे.
Life doesn’t give everyone a second chance; hope they learn from their mistakes
Location – Ranchi- Patna highway
Shared by Dr. Shankar Mahto #driveresponsibly pic.twitter.com/561LfAF60I— Prateek Singh (@Prateek34381357) February 15, 2025
ही घटना दिल्ली-पटना नॅशनल हायवेवर घडली आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता. एक तरुण भरधाव वेगानं बाईक चालवत आहे. लक्षवेधी बाब म्हणजे या तरुणाच्या पाठी आणखी दोन जण बसले आहेत. पण ट्रिपल सीट असताना देखील तो आसपासच्या गाड्यांना कट मारत पुढे जातोय. पण त्याची ही हिरोगीरी चांगलीच बाहेर पडली. एका ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात बाईकचा तोल गेला अन् ते तीघेही चाकांखाली पडले Accident video viral.