Man jumps off building सोशल मीडियावर अनेकदा विचित्र आणि धक्कादायक व्हिडिओ समोर येत असतात. अनेकदा लोक स्टंटबाजी करण्याच्या नादात स्वत:चा जीव धोक्यात टाकताना दिसतात. अशाच एका व्हिडिओची सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती इमारतीवर चढलेला दिसत आहे आणि शेवटी जीवाची पर्वा न करता थेट उडी मारतो. हा सर्व धक्कादायक प्रकार व्हिडीओमध्ये कैद झाला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतक्या उंचावरून उडी मारूनही त्या इसमाला काहीही होत नाही हे पाहून नेटकऱ्यांना धक्काच बसला आहे.
In Durg, Chhattisgarh : Man jumps from 3rd floor, gets Electrocuted and entangled in electric wires, passes out and then falls and then miraculously gets up to throw bricks at police
pic.twitter.com/PfgMnVh7J6— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) February 23, 2025
व्हिडिओ छत्तिसगडच्या दुर्ग भागातील आहे. इंदिरा मार्केटमध्ये घडलेल्या घटनेत एका चार मजली इमारतीच्या छतावर उभा असल्याचे दिसत आहे. हा छतावर उभ्या व्यक्तीला पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. लोक त्याला ओरडून खाली उतरण्यास सांगत आहेत. पोलिसही घटना स्थळी उपस्थित होते आणि परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पण तो व्यक्ती कोणाचेच ऐकत नाही. गर्दी जमताच, तेजराजने विटा आणि दगड फेकले आणि वाहनांचे नुकसान केले. पोलिस आल्यावर त्यांनी त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला, पण व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे त्याने अचानक उडी मारली.
In Durg, Chhattisgarh : Man jumps from 3rd floor, gets Electrocuted and entangled in electric wires, passes out and then falls and then miraculously gets up to throw bricks at police
pic.twitter.com/PfgMnVh7J6— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) February 23, 2025
पोलिस काही करतील त्या आधीच तो व्यक्ती उंच इमारतीवरून उडी मारतो ज्यामुळे उपस्थितांसह पोलिसांनाही धक्का बसतो. जमिनीवर पडण्याऐवजी तो वीज प्रवाह सुरू असलेल्या तारेला धडकला, त्याला विजेचा धक्का बसला आणि तो पहिल्या मजल्यावरील बाल्कनीत पडला. काही क्षणांसाठी, पाहणाऱ्यांना वाटले की, तो मेला आहे, पण तो उठला आणि त्यानंतर त्याचा तमाशा सुरू असतो.