Rations : छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागातील सर्व शेतकऱ्यांसह नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील एपीएल (केशरी) रेशन कार्ड धारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजना लागू करण्यात आली आहे. यासाठी शासन निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत संबंधित शेतकऱ्यांना थेट पैसे मिळतील.
‘या’ लोकांचे रेशन कार्ड होणार रद्द
सदर योजनेची अंमलबजावणी २०२३ च्या जानेवारीपासून करण्यात येईल, ज्या अंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला महिना प्रतिक १५० रुपये रोख रक्कम मिळेल. तसेच २०२४ च्या २० जूनच्या परिपत्रकानुसार, एपीएल (केशरी) रेशन कार्ड धारक शेतकऱ्यांना दरमहा १७० रुपये रक्कम दिली जाईल.
‘या’ लोकांचे रेशन कार्ड होणार रद्द
अशा शेतकऱ्यांना त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यावर डीबीटीद्वारे थेट पैसे ट्रान्सफर केले जातात. या योजनेंतर्गत, १४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी आर्थिक सहाय्य मिळणार आहे. वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालयाने या निर्णयावर मंजुरी दिली आहे.
अर्ज कसा करावा?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना संबंधित स्वस्त धान्य दुकानदाराकडे अर्ज करावा लागेल. अर्जाचा नमुना तिथेच उपलब्ध होईल. अर्जासोबत बँक पासबुकच्या पहिल्या पानाची आणि रेशन कार्डच्या पहिल्या व शेवटच्या पानाची प्रत जोडावी लागेल Rations.