SCOOTY ACCIDENT VIRAL VIDEO : सध्या रस्ते अपघातांचं प्रमाण खूप वाढत चाललंय. त्यामधले काही अपघात हे वाहनचालकांच्या चुकीमुळे होताना दिसतात; तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. गाडी चालवताना नेहमी नियमांचं पालन करावं, हेल्मेट घालावं, फोनचा वापर करू नये, अशा सुरक्षिततेच्या सूचना अनेकदा देऊनही लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि आपला जीव धोक्यात घालतात.
View this post on Instagram
एक अपघात आपल्याबरोबरच दुसऱ्याचं आयुष्यदेखील संपवू शकतो, हेदेखील आजकाल अनेकांना कळत नाही. यात कोणाचं नशीब चांगलं असेल, तर तो वाचतो, नाही तर असे भयंकर अपघात अनेकांचे जीवच घेतात. सध्या सोशल मीडियावर एक असाच व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एका दुचाकीमुळे भयंकर अपघात झाला. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊ या…
View this post on Instagram
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये नवरा-बायको रस्त्यावरून आपल्या दिशेनं चालत जात असतात. तेवढ्यात मागून अचानक भरवेगात एक स्कूटर येते आणि त्या दोघांना जोरदार धडक देते. अचानक धडक दिल्यानं नवरा-बायको दोघंही रस्त्यावर जोरदार आदळतात. स्कूटरच्या धडकेनं नवरा वेगात दूरवर जाऊन आदळतो. हा भयंकर अपघात अवघ्या काहीच सेकंदांत घडतो. यादरम्यान, हा अपघात नेमका कुठे झाला आहे याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
View this post on Instagram
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @roadsafetycontent या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे आणि त्याला ‘वाहन चालवतानाची तुमची एक अनावश्यक चूक तुमचं आणि इतरांचं कुटुंब उद्ध्वस्त करू शकते’ अशी कॅप्शन देण्यात आली आहे. तसंच “रस्ते अपघात आयुष्यात प्रत्येकाला सावरण्याची दुसरी संधी देत नाही.” असंही त्या व्हिडीओमध्ये लिहिलं आहे. व्हिडीओ व्हायरल होताच त्याला २४ लाखांपेक्षा व्ह्युज आले आहेत SCOOTY ACCIDENT VIRAL VIDEO.