Tiger Viral Video : एक वाघ शौचालयाच्या खिडकीतून घरात शिरण्याचा प्रयत्न करता असल्याचा व्हिडीओ आला समोर, घरातील सदस्याने व्हिडीओ काढून केला सोशल मीडियावर शेअर
View this post on Instagram
Tiger viral video : सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामधल्या लहान मुलं आणि विविध प्राण्यांच्या व्हिडीओला अधिक पसंती मिळत असते. या प्राण्यांमध्ये काही कुत्रा मांजर यांसारख्या पाळीव प्राण्यांचे क्यूट व्हिडीओ असतात तर अनेक जंगली प्राण्यांचे शिकार करताना किंवा चालतानाचे व्हिडीओ असतात. यामध्ये सिंह, चित्ता आणि वाघाचे व्हिडीओ अधिक प्रमाणात व्हायरल होतात.व्हिडीओमध्ये दिसणारे वाघ, चित्तासारखे जंगली प्राणी कधी अचानक आपल्या घराजवळ दिसला तर? अशी परिस्थिती कोणावर ओढवली, तर त्या व्यक्तीची स्थिती तिथेच अर्धमेल्यासारखी होईल हे नक्कीच. सध्या समाजमाध्यमांवर एक असाच व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात वाघ एका घरातील शौचालयात शिरण्याचा प्रयत्न करत आहे. हे पाहून तेथील व्यक्तीनं वाघाला पाहून नेमकं काय केलं आणि पुढे काय घडलं, ते व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हीच पाहा…
View this post on Instagram
एक वाघ घरातील शौचालयाच्या खिडकीतून घरात शिरण्याचा प्रयत्न करता असल्याचा व्हिडीओ @motivation_line_daily या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘इस स्थिती में आपका पहला कदम क्या होगा’ अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. ही घटना नेमकी कुठे घडली ते अद्याप कळू शकलेले नसले तरी या व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर १० लाखपेक्षा अधिक व्ह्युज आले असून आणखी व्ह्युज या व्हिडीओला मिळत आहेत.
View this post on Instagram
हा वाघाचा व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क झाले असून त्यावर विविध तर्क-वितर्क लावत आहेत. काही नेटकरी व्हिडीओ कुठला आहे हे कळू शकले नसल्यामुळे या व्हिडीओला एआय असल्याचे बोलत आहेत. तर काहींना हा व्हिडीओ खरा वाटत आहेत. या पोस्टच्या खाली एका युजरनं कमेंट करीत लिहिलं, “शौचालय सुरक्षा वाढावा.” तर दुसऱ्याने, “तो अंघोळ करायला आला आहे वाटतं. खूप दिवस त्यानं अंघोळ केली नसेल” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करीत म्हणाला, “पुढे पाऊल तर वाघ उचलेल. आपल्याला फक्त सावधान राहायचं आहे.” “ज्याने व्हिडीओ बनवला आहे, तो जिवंत आहे का” असा प्रश्नदेखील एकाने विचारला. “मी तर बेशुद्धच झाले असते”, “तोंडावर चप्पल मारून पळून जायचं” अशा विविध प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.